Kedarnath: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, यात्रेकरू थोडक्यात बचावले...थरारक व्हिडिओ पाहा

Kedarnath: केदारनाथ धाममध्ये पायलटच्या शहाणपणामुळे मोठी दुर्घटना टळली. हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
Emergency landing of helicopter in Kedarnath-
Emergency landing of helicopter in Kedarnath-esakal

Kedarnath: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना टळली. केदारनाथ धाममध्ये हेलिकॉप्टर पायलटच्या शहाणपणामुळे हा अपघात टळला. केदारनाथ धाममध्ये प्रवाशांनी भरलेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. क्रिस्टलच्या हेलिकॉप्टरचे रडर खराब झाल्याची माहिती मिळाली आहे.

Emergency landing of helicopter in Kedarnath-
Sambit Patra : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरली, भाजपचे संबित पात्रा करणार तीन दिवस उपवास, नेमकं काय म्हणाले होते?

हेलिकॉप्टर सुखरूप उतरल्यानंतर यात्रेकरूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा नेहमीच जोखमीची राहिली आहे. केदारनाथमध्ये गेल्या 11 वर्षांत 10 अपघात झाले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, आज शुक्रवारी सकाळी ७ वाजता क्रेटन एव्हिएशन कंपनीची हेली सहा प्रवाशांना घेऊन केदारनाथसाठी निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचे केदारनाथ हेलिपॅडच्या 100 मीटर आधी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

प्रवाशांच्या मदतीसाठी अधिकारी पोहोचले

पायलट कल्पेश यांनी आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित लँडिंग केले, ज्यामध्ये सर्व भाविक सुरक्षित आहेत. घटनेदरम्यान पोलीस व प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रवाशांना मदत करत मंदिरात नेले.

Emergency landing of helicopter in Kedarnath-
Delhi-Jammu NH: बसचा अक्षरशः चुराडा, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com