अयोध्या येथील मशिदीसाठी पहिली देणगी दिली हिंदू व्यक्तीने

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 4 October 2020

अयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या धन्नीपूर मशिदीला 21 हजार रुपयांच्या देणगीचा पहिला धनादेश मिळाला आहे.

लखनऊ- अयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या धन्नीपूर मशिदीला 21 हजार रुपयांच्या देणगीचा पहिला धनादेश मिळाला आहे. या मशिदीसाठी इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या मशिदीला पहिली देणगी ही लखनऊ येथील रोहित श्रीवास्तव यांनी दिली आहे. त्यांनी मशिदीच्या ट्रस्ट कार्यालयात देणगीचा धनादेश जमा केला आहे.   

रोहित श्रीवास्तव हे लखनऊ विद्यापीठातील विधी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मशीद उभारण्यासाठी मिळालेली ही पहिली देणगी आहे. यापूर्वी ट्रस्टचे सचिव अतहर हुसेन म्हणाले होते की, मशिदीला केवळ प्रामाणिकपणे कमावलेल्या पैशातून देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये विशेषतः वीज चोरी, कर चोरी, लाच, तस्करी, खंडणी किंवा सरकारी कायद्याविरोधात कमावलेले धन घेतले जाणार नाही. 

Hathras case: पीडिता आणि आरोपींच्या कुटुंबात 23 वर्षांपासून वैर

ही मशीद आधुनिक आर्किटेक्ट डिझाइननुसार उभारली जाणार आहे. मशिदीचे डिझायन जामिया मिलिया इस्लामियाच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख प्रोफेसर एस एम अख्तर तयार करणार आहेत. मशिदीचे बांधकाम पारंपारिक मशिदीप्रमाणे नसेल. ही एक आधुनिक मशीद असेल, असे प्रो. अख्तर यांनी सांगितले.  

रामविलास पासवान यांची प्रकृती खालावली, रात्री शिरा झाली हार्ट सर्जरी

प्रख्यात इतिहासकार आणि जेएनयूचे सेवानिवृत्त प्रोफेसर पुष्पेश पंत यांना अयोध्या येथील धन्नीपूर मशिदीच्या संग्रहालय आणि ग्रंथालय विभागाचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employee Of Lucknow University Rohit Srivastava Donated 21 Thousand To Dhannipur Mosque in Ayodhya