
मार्केटिंग फर्म हिंदुस्तान पॉवरलिंक्सच्या कर्मचाऱ्यांना क्रूर छळाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. कंपनीचे उच्च अधिकारी त्यांचे लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर अमानुष आणि क्रूर अत्याचार करत आहेत. कर्मचाऱ्यांना कुत्र्यांसारखे गळ्यात पट्टे बांधून फिरायला, पाणी पिण्यास आणि जमिनीवरून कुजलेली फळे चाटण्यास भाग पाडले जात आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.