पंतप्रधान मोदींनी हा 'तमाशा' बंद करावा- अशोक गेहलोत

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

राजस्थानमध्ये सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात सुरु असलेला तमाशा बंद करण्याचे आवाहन केलं आहे.

नवी दिल्ली- राजस्थानमध्ये सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात सुरु असलेला तमाशा बंद करण्याचे आवाहन केलं आहे. भाजप राज्यातील सरकार पाडण्यासाठी आमदार खरेदी करण्याचा खेळ खेळत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. ते जैसलमैर येथे माध्यमांशी बोलत होते. 

तुमचा पगार येणार कमी; ऑगस्टपासून पुन्हा बदलणार नियम

राजस्थानमधील राजकीय घडामोडींचे सत्र अजून संपलेले नाही. राज्यपाल यांनी 14 ऑगस्ट रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यास मंजुरी दिल्यानंतर काँग्रेसचे आमदार जैसलमैरला पोहोचले आहेत. गेहलोत यांनी भाजप आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. जेव्हा राज्यात विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची घोषणा झाली, तेव्हा राजस्थानात आमदार खरेदीचा रेट वाढला आहे. पूर्वी आमदारांना 10 कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले जात होते, आता ते वाढून 15 कोटी रुपये झाले आहेत. सर्वांना माहित आहे की कोण लोक आमदार खरेदीचं काम करत आहे, असं ते म्हणाले आहेत.  

दुर्भाग्याने यावेळी भाजप नेत्यांकडून खरेदीचा मोठा खेळ सुरु आहे. भाजप कर्नाटक आणि मध्य प्रदेशचा प्रयोग येथे करु पाहात आहे. संपूर्ण गृह मंत्रालय या कामाला लागले आहे. पण आम्हाला कशाची काळजी नाही. आम्हाला लोकशाहीची काळजी आहे. आमची लढाई कोणासोबतही नाही. आमची विधारधारा, निती याच्याशी लढाई आहे. निवडून आलेल्या सरकारला पाडणे ही लढाई असू शकत नाही. आमची लढाई कोणा व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नाही, तर आमची लढाई लोकशाही वाचवण्यासाठी असल्याचं ते म्हणाले आहेत.  

नवीन शैक्षणिक धोरणही चीनच्या विरोधात!

पंतप्रधान मोदी यांना जनतेने पुन्हा निवडून देऊन मोठी संधी दिली आहे. राजस्थानमध्ये जो काही तमाशा सुरु आहे तो त्यांनी बंद करावा, असं गेहलोत म्हणाले. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सचिन पायलट आणि अन्य 18 आमदारांनी गेहलोत यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे गेहलोत यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना सत्ता टिकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी विधानसभेचे अधिवेशन भरवण्याची मागणी राज्यपाल मीश्र यांच्याकडे केली होती. मोठ्या संघर्षानंतर त्यांना 14 ऑगस्ट रोजी विधानसभेचे अधिवेशन घेण्याची परवानगी मिळाली आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: End This Tamasha Ashok Gehlot To PM Modi On Rajasthan Crisis