वद्रा यांना 'ईडी'चा दणका; न्यायालयाकडे कोठडीची मागणी

वृत्तसंस्था
Thursday, 26 September 2019

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील धागेदोरे थेट रॉबर्ट वद्रा यांच्यापर्यंत जात असल्याने त्यांची कोठडीत सुनावणी होणे आवश्‍यक आहे, अशी मागणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज दिल्ली उच्च न्यायालयात केली.

नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील धागेदोरे थेट रॉबर्ट वद्रा यांच्यापर्यंत जात असल्याने त्यांची कोठडीत सुनावणी होणे आवश्‍यक आहे, अशी मागणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज दिल्ली उच्च न्यायालयात केली.

रॉबर्ट वद्रा हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आहेत. वद्रा हे चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचेही "ईडी'ने न्यायालयात सांगितले. वद्रा यांच्या वकिलांनी मात्र "ईडी'च्या युक्तिवादाला विरोध केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच नोव्हेंबरला होणार आहे.

रॉबर्ट वद्रा यांच्या कोठडीची मागणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केली असता रॉबर्ट वद्रा हे भारतात नसून ते स्पेनमध्ये आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते भारतात परतण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंगच्या केसमध्ये रॉबर्ट वद्रा यांची ईडीला चौकशी करायची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enforcement Directorate Asks Court For Robert Vadras Custody