ED Notice : ‘ED’चे मोठे पाऊल!, इंटरपोलकडून पहिल्यांदाच पर्पल नोटीस जारी

Interpol Action : आता काळ्या पैशावरील फास अधिक आवळला जाणार
ED Action
ED ActionEsakal
Updated on

Enforcement Directorate major action: अंमलबजावणी संचालनालयाला मोठे यश मिळाले आहे. ईडीने इंटरपोलद्वारे पहिल्यांदाच पर्पल नोटीस जारी केली आहे. ही नोटीस २१ ऑगस्ट २०२५ रोजी जारी करण्यात आली होती आणि त्यात व्यापार-आधारित मनी लाँड्रिंगचा एक नवीन प्रकार उघडकीस आला होता.

इंटरपोलची पर्पल नोटीस प्रत्यक्षात जगातील १९६ सदस्य देशांच्या एजन्सींना हे माहिती देणयासाठी आहे, की गुन्हेगार कशाप्रकारे नवनवीन पद्धतींनी कायद्याला चुकवत आहेत. तर ईडीच्या तपासात असे दिसून आले की काही देशी आणि परदेशी शेल कंपन्या एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रूपांतर करत होत्या. यासाठी त्यांनी व्यापाराचा आधार घेतला.

अशाप्रकारे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा खोटा सापळा रचण्यात आला, जेणेकरून प्रत्यक्षात होणारी प्रचंड मनी लाँड्रिंग लपवता येईल. ही पद्धत हवालासारखीच आहे, फरक फक्त एवढाच आहे की हे सर्व बँकिंग चॅनेल आणि शेल कंपन्यांद्वारे घडले, जेणेकरून नियामक त्यांना पकडू शकले नाही.

ED Action
Devendra Fadnavis Warning : ‘’आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल’’ ; फडणवीसांचा विरोधकांना कडक इशारा!

ईडीच्या या पर्पल नोटीसवरून असे दिसून येते की, भारत आता केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मनी लाँड्रिंगसारख्या गुन्ह्यांशी लढण्यात मोठी भूमिका बजावत आहे. गुन्हेगारांना कुठेही सुरक्षित आश्रय मिळू नये म्हणून ईडी ग्लोब नेटवर्क आणि अॅसेट रिकव्हरी इंटर-एजन्सी नेटवर्क सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून जगाला जागरूक करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com