Devendra Fadnavis Warning : ‘’आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल’’ ; फडणवीसांचा विरोधकांना कडक इशारा!

Devendra Fadnavis warns opposition : इतर कुठल्याही सरकारच्या काळात मराठा समजाला न्याय मिळालेला नाही. आरक्षणाचं कामही आम्ही केलेलं आहे, असंही फडणवसी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे.
CM Fadnavis
CM Fadnavisesakal
Updated on

Devendra Fadnavis on Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. विरोधी पक्षाचे नेते या आंदोलनावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल असा कडक इशारा दिला आहे.

मीडियाला प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''शेवटी आमचा एकच प्रयत्न आहे, की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकांच्या समोर येवून उभा राहिलेले आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होवू नये. म्हणून ओबीसी समजालाही आपल्याला सांभाळावं लागेल, मराठा समजालाही न्याय द्यावा लागेल. शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो, की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षांमध्ये जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं, दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार. या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे.''

तसेच, इतर कुठल्याही सरकारच्या काळात मराठा समजाला न्याय मिळालेला नाही. आरक्षणाचं कामही आम्ही केलेलं आहे, सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचं कामही आम्हीच केलेलं आहे आणि उद्योजक तयार केलेले आहेत. त्यासोबतच पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ताही आम्हीच सुरू केलेला आहे. परदेशात विद्यार्थ्यांना पाठवणंही आम्हीच सुरू केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या रोजगाराच्या असतील त्या आमच्याच सरकारने केलेल्या आहेत.  असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

CM Fadnavis
Fadnavis Reaction on Jarange Hunger Strike: मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले..

याशिवाय, मराठा समजाबाबत आम्ही सकारात्मकच आहोत. कुठल्याही प्रकारे मराठा समाजाबाबत आमच्या मनात शंका नाही. मराठा समजाच्या पाठिशी आम्ही आहोत. पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करत आहेत, की हे कसं पेटलं पाहीजे. कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहीजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहीजे. काही लोकांची विधानं मी सकाळी बघितली. त्यांचे प्रयत्न काय आहेत हे माझ्या लक्षात येत आहेत. पण त्यांना मी सांगतो, अशाप्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल. हे मला त्यांना सांगायचं आहे. असा इशारा यावेळी फडणवीसांनी विरोधकांना दिला.

CM Fadnavis
CM on Maratha Protest : जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण होतंय, पण नुकसानच होईल; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

तसेच शेवटी मुंबई, महाराष्ट्र आपली सामाजिक वीण या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला एखादा निर्णय जर घ्यायचा होता, तर त्याचे परिणाम दीर्घकालापर्यंत होतो. त्यामुळे अशाप्रकारे निर्णय हे चर्चेतून घ्यायचे असतात, सर्वसंमतीने घ्यायचे असतात. एकमेकांना झुंजवणं हे सरकारचं धोरण नाही. आम्ही प्रयत्नपूर्वक मार्ग काढत आहोत. असं यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com