
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांची 11.86 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
J-K Cricket Association money laundering case:- जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांची 11.86 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ( Enforcement Directorate) ही कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA)संबंधी हे प्रकरण आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीला पुणे विद्यापीठाने...
ईडी जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपांचा तपास करत आहे. सीबीआयने 2002-11 मध्ये 43.69 कोटी रुपयांच्या गैरवापरासाठी 2018 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला आणि अन्य तिघांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
अब्दुल्ला यांची ऑक्टोंबर महिन्यात दोन वेळा चौकशी झाली होती. पण, त्यांचा पक्ष चौकशीला सध्याच्या राजकीय स्थितीसोबत जोडून पाहात आहे. जम्मू-काश्मीरला लागू असलेला विशेष दर्जा मागील वर्षी काढून टाकण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील सर्व पक्षांनी एकत्र येत गुपकार आघाडीची स्थापना केली. नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रवक्ताने आरोप केलाय की, ईडीचे पत्र गुपकार घोषणेच्या नंतर आले आहे. काश्मीरमध्ये पीपल्स अलायन्स बनल्यानंतर हा सरळसरळ राजकीय विरोध आहे.
राहुल गांधींकडे पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची धूरा? बैठकीत स्पष्ट संकेत
आम्हाला माहित होतं असं होणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप आपल्या विविध संस्थांचा वापर राजकीय विरोधासाठी करत आहे, कारण ते राजकीय पद्धतीने आमच्याशी लढू शकत नाहीत, असंही प्रवक्ते म्हणाले आहेत. इतिहास साक्ष आहे की विरोध पक्षांना कशाप्रकारे लक्ष्य केले जात आहे. विरोधी नेत्यांना विविध माध्यमातून त्रास दिला जात आहे. त्याचमुळे फारूक अब्दुल्ला यांच्यावर कारवाई केली जात आहे, असंही ते म्हणाले.