दाऊदच्या 'डी-कंपनी'कडून क्रिप्टोचा वापर, ED चे साथिदारांवर छापे

enforcement directorate  probes use of cryptocurrency by d company raids on dawood associates
enforcement directorate probes use of cryptocurrency by d company raids on dawood associates Team eSakal

अंमलबजावणी संचालनालय (ED) हे भारतातील अंडरवर्ल्ड डॉन, मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या डार्कनेट (Darknet) आणि क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) च्या वापराचा तपास करत आहे. अंडरवर्ल्ड डॉन ऑफशोअर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिजिटल करंसीचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, दाऊद इब्राहिम बेटिंगपासून ड्रग्ज तस्करी आणि खंडणीपर्यंतच्या अनेक अवैध धंद्यात सामील असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी त्याच्या अनेक साथीदारांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बेकायदेशीर व्यवसायांमधून मिळणाऱ्या कमाईचा मोठा भाग क्रिप्टोकरन्सी आणि रिअल इस्टेट खरेदीमध्ये गुंतवला गेला आहे. हवाला व्यवहारातून पैसे वॉलेटमध्ये पाठवले जातात. त्या वॉलेटमधील रक्कम नंतर रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी वापरले जाते. अधिकाऱ्याच्या मते, संयुक्त अरब अमिराती (UAE) हे या बाबतीत त्यांचे आवडते ठिकाण आहे. D-कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी सिंडिकेटचे UAE मध्ये पैसे पाठवण्यासाठी हवालाचे मजबूत नेटवर्क आहे असे सांगण्यात येते.

enforcement directorate  probes use of cryptocurrency by d company raids on dawood associates
रेडमीचा रेकॉर्ड ब्रेकिंग सेल! फक्त 1 मिनिटात विकले 330 कोटींचे फोन

दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला, ईडीने इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आणि दाऊदची बहीण हसिना पारकरच्या नागपाडा येथील घरासह, दोन बिल्डर्स आणि मुंबईभर छापे टाकण्यात आले. तपास यंत्रणा इब्राहिमचा विश्वासू सहकारी छोटा शकीलच्या जवळच्या नातेवाईकाची चौकशी करत आहे. अधिका-याने सांगितले की, अद्याप तपास सुरू आहे आणि अनेक व्यवहार तपासले जात आहेत. अधिकार्‍यांच्या मते, प्रामुख्याने बेकायदेशीर फाइल शेअरिंगसाठी लिमीटेड अॅक्सेस असलेले कंप्युटर नेटवर्क वापरले जातात, त्यामुळे तपासात अडचणी येतात.

enforcement directorate  probes use of cryptocurrency by d company raids on dawood associates
आलिया भट्टने चाहत्यांना दिलं गंगूबाई चॅलेंज, तुम्हीही करा ट्राय..

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, डी-कंपनी, डार्कनेट आणि क्रिप्टो प्रकरणांमध्ये तपास करणे कठीण आहे. दुसरीकडे, डार्कनेट बेटिंग सोपे करते. अधिका-यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात बेकायदेशीर सट्टेबाजी हा डी-कंपनीचा मुख्य व्यवसाय म्हणून उदयास आला आहे.

अधिकार्‍यांच्या मते, डार्कनेट आणि क्रिप्टोने क्रिप्टो मुळे कोरोना काळात देखील सट्टेबाजीचा व्यवसाय टिकून आहे. ही हजारो कोटींची समांतर अर्थव्यवस्था आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सी ही एक नवीन गोष्ट आहे, ज्यामुळे व्यवहार सोपे होतात. महत्त्वाचे म्हणजे, ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि अनेक राज्यांच्या पोलिसांनी दहशतवाद आणि अंमली पदार्थ तस्करीत क्रिप्टोकरन्सीच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे.

enforcement directorate  probes use of cryptocurrency by d company raids on dawood associates
Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर, आता 'या' शहरात देखील होणार विक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com