पत्नीच्या त्रासाला कंटाळून बंगलुरुमधील एआय इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणानंतर आता जयपूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. यामध्ये 28 वर्षीय अभियंता शुभम शर्मा यानेही पत्नीचा त्रास सहन न झाल्याने होऊन गळफास लावून आत्महत्या केली. शुभम शर्माने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे - 'मम्मी, मला माफ कर, मी खूप अस्वस्थ आहे, मी सर्वकाही नीट करू शकत नाही.' राजधानी जयपूरमधील महेश नगरमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. या घटनेनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला . त्यांनी मुलाची पत्नी आणि सासरच्या मंडळींवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत