esakal | इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स विश्वकरंडक स्पर्धेला मुकणार?
sakal

बोलून बातमी शोधा

ben stokes

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स विश्वकरंडक स्पर्धेला मुकणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंडने आपला संघ अजून जाहीर केलेला नाही, परंतु आयसीसीच्या काही डेडलाईननुसार एकदोन दिवसांत संघ जाहीर करावा लागणार आहे.

स्टोक्सवर जुलै महिन्यात शस्त्रक्रिया झाल्यापासून तो सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून दूर असून सध्या तो त्याच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे स्टोक्स भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला तसेच १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या सत्रालाही मुकणार आहे. त्यामुळेच राजस्थान रॉयल्सने वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ओशाने थॉमसचा स्टोक्सचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश केला आहे.

२०१९ च्या जागतिक अजिंक्यपदामध्ये इंग्लंडच्या विजयात मालिकावीर ठरलेल्या स्टोक्सचा मोलाचा वाटा होता; मात्रा सध्या तो कुठल्याही प्रकारचे क्रिकेट खेळण्याच्या मानसिकतेत नसल्याचे समजत आहे.

त्यामुळे तो पुढील एकदोन दिवसांत आगामी विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघासाठी उपलब्ध असण्याची शक्यता फार कमी आहे.

loading image
go to top