esakal | फाडफाड इंग्लिश बोलताना, गावाकडच्या आजीनं सांगितलं गांधी तत्वज्ञान; व्हिडिओ पाहाच!
sakal

बोलून बातमी शोधा

english speaking grandmother video goes viral about mahatma gandhi hindu muslim love

सध्या सोशल मीडियावर उत्तर भारतातील एका आजीचा व्हिडिओ शेअर होताना दिसत आहे. पेहरावानुसार ही आजी राजस्थान, दिल्ली, हरियाणा या परिसरातील वाटत आहे.

फाडफाड इंग्लिश बोलताना, गावाकडच्या आजीनं सांगितलं गांधी तत्वज्ञान; व्हिडिओ पाहाच!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत गेल्या आठवड्यात मोठी दंगल उसळली होती. दोन धर्मातील लोक एकमेंकांच्या जीवावर उठले होते. सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट दिसू लागल्या होत्या. अशा वातावरणात एका आजीचा व्हिडिओ मात्र समाधान देणारा आहे. एखाद्या कार्पोरेट प्रमाणं फाडफाड इंग्लिश  बोलणारी ही आजी राष्ट्रपीता महात्मा गांधींचं तत्वज्ञान सांगत आहे. महात्मा गांधीचं हिंदू आणि मुस्लिम दोघांवरही प्रेम होतं, असं ही आजी सांगत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या सोशल मीडियावर उत्तर भारतातील एका आजीचा व्हिडिओ शेअर होताना दिसत आहे. पेहरावानुसार ही आजी राजस्थान, दिल्ली, हरियाणा या परिसरातील वाटत आहे. व्हिडिओमध्ये आजीनं महात्मा गांधी यांच्या विषयी मत व्यक्त केलंय. Mahatma Gandhi was the greatest man in the world अशी सुरुवात करताना, आजीनं जाता जाता गांधी तत्वज्ञानाचा जणू डोसच पाजला आहे. आजीचे इंग्लिश उच्चार भल्या भल्यांना तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. आजीनं गांधीजींच्या आयुष्यातील तारखा मात्र हिंदीमध्ये सांगितल्या आहेत. हे सगळं असलं तरी आजीचा आत्मविश्वास मात्र दाद देण्यासारखा आहे. आजीनं गांधीजींचं हिंदू आणि मुस्लिम सगळ्यांवर प्रेम होतं, असं सांगून दंगलीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा संदेश दिलाय. गांधीजी अतिशय सामान्य कुटुंबातून आले होते. त्याचं राहणीमान, खाणं सगळं साधं होतं ते शेळीचं दूध प्यायचे, अशी माहिती आजीनं दिलीय. अर्थात इंग्लिशमध्ये दिलीय.