esakal | बिहारच्या रिंगणात ओवेसी यांची उडी
sakal

बोलून बातमी शोधा

owaisi-asaduddin

असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी जनता दलाचे प्रमुख देवेंद्र यादव यांच्याशी युती केली आहे

बिहारच्या रिंगणात ओवेसी यांची उडी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा - असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी जनता दलाचे प्रमुख देवेंद्र यादव यांच्याशी युती केली आहे. या युतीला संयुक्त लोकशाही धर्मनिरपेक्ष आघाडी (यूडीएसए) असे नाव दिले आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ओवेसी आणि देवेंद्र यादव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली. या आघाडीत अनेक पक्ष सहभागी होतील, असा दावा करीत त्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे सांगितले. ओवेसी यांनी ‘मुसलमान कोणाची जहागिरी नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली. ओवेसी यांनी लालू प्रसाद आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर मुसलमानांना फसविल्याचा आरोप केला.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा