marble slurry Garbage Depo
sakal
किसनगडमधील संगमरवर उद्योगाने १९८०च्या दशकामध्ये वेग पकडला आणि ‘मार्बल स्लरी’ची विल्हेवाट लावण्यासाठी ३० वर्षांपूर्वी या व्यापाऱ्यांना दोन भूखंड देण्यात आले. ‘मार्बल स्लरी’ टाकत गेल्यामुळे या भागात शुभ्र पांढरे डोंगर उभे राहिले आणि बर्फाच्छादित प्रदेशासारखा दिसणारा हा भाग पर्यटकांना आकर्षित करत आहे. कॅमेऱ्यासह या भागात जाण्यासाठी ५०० रुपये शुल्क आहे. प्री-वेडिंग छायाचित्रणासाठी ५१००, तर व्यावसायिक चित्रीकरणासाठी २१ हजार रुपये आकारले जातात.