
दिल्लीच्या लुटियंस भागात एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्त्राईली दुतावासाबाहेर शुक्रवारी सांयकाळी आयआयडी बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली
नवी दिल्ली- दिल्लीच्या लुटियंस भागात एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्त्राईली दुतावासाबाहेर शुक्रवारी सांयकाळी आयआयडी बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोट झाल्याच्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली असून त्यावर इस्त्राईली दुतावासाचा पत्ता लिहिण्यात आला आहे. याबाबत अधिकची माहिती कळू शकलेली नाही. याशिवाय घटनास्थळावरुन काही बॉल बेअरिंग मिळाले असून याचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी केला जातो.
स्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून पाहतोय इस्त्राईल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटा ठिकाणी एक चिठ्ठी सापडली आहे. याआधी दिल्ली पोलिस अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी अनिल मित्तल यांनी म्हटलं की, अति-सुरक्षित भागात झालेल्या स्फोटामुळे काही गाड्यांच्या काचा तुटल्या आहेत आणि प्राथमिक तपासातून असं दिसतंय की खळबळ माजवण्यासाठी हा स्फोट करण्यात आला आहे.
पोलिसांवर AK-47 ने गोळीबार करत फरार झालेल्या गँगस्टरला कोल्हापुरात अटक
आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी संवेदनशील असलेला इस्त्राईल हा स्फोट दहशतवादी हल्ला म्हणून पाहात आहे. अति-सुरक्षित असलेल्या भागात झालेल्या स्फोटोमुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे, तसेच अनेक ठिकाणी छापेमारी केली गेली आहे.
#WATCH | Delhi Police Special Cell team outside Israel Embassy in New Delhi where a low-intensity explosion took place yesterday. pic.twitter.com/mmpNbhDkV4
— ANI (@ANI) January 30, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिल्लीस्थित इस्त्राईल दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. दिल्ली पोलिस आणि अग्निशमन दलाला जवळपास 5:45 वाजता घटनेची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्नीशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
Delhi: A team of the Special Cell of Delhi Police outside Israel Embassy where a low-intensity explosion occurred yesterday. pic.twitter.com/JiafPd200N
— ANI (@ANI) January 30, 2021
विशेष पोलिस पथक, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी तसेच गुप्तचर विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत. यापूर्वी 13 फेब्रुवारी 2012 रोजी दिल्लीस्थित इस्त्रायल दूतावासातील एका कारवर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात इस्त्रायलचे राजन्यायिक अधिकारी ताल येहोशुआण आणि चालकासह चार जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणात त्यावेळी एकाला अटकही झाली होती.