Eran Heritage Site: हडप्पाकालीन संस्कृती ते गुप्तकाळातील नाणी अन् शिल्पे; एरणमध्ये उभारणार ऑनसाईट म्युझियम, नक्की भेट द्या

Eran Archaeological Site, Sagar, Heritage Developmen: मध्य प्रदेशातील ऐतिहासिक एरणचा होणार विकास; ऑनसाइट म्युझियम आणि व्याख्या केंद्र उभारण्याची संकल्पना
eran heritage site

eran heritage site

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील ऐतिहासिक एरण हे पुरातत्त्वीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे. बीना नदीच्या काठावर वसलेल्या या प्राचीन स्थळावर विविध कालखंडांतील मानवी वसाहती, शिल्पे, नाणी, मातीची भांडी आणि शिलालेखांचे पुरावे आढळले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने यापूर्वीही एरण येथे उत्खनन केले असून, २०२०-२१च्या उत्खननात नाणी, लोखंडी वस्तू, मातीच्या वस्तू, मणी आणि अन्य पुरातत्त्वीय अवशेष सापडले होते.

केंद्र सरकारने २०२६च्या अर्थसंकल्पात Development of Excavation Sites and Heritage Complexes (DESH) ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील १५ निवडक पुरातत्त्वीय स्थळांचा शाश्वत विकास, संवर्धन आणि पर्यटकांसाठी अनुभवाधारित सुविधा विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com