Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Jalgaon Car Accident News जळगावकडून मुक्ताईनगरच्या दिशेने येणाऱ्या कारने चार मजुरांना धडक दिलीय. गाडी राँग साइडने आली होती. कारला दोन नंबर प्लेट लावण्यात आल्याचं आढळून आलं आहे.
Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या
Updated on

​मुक्ताईनगर (दिपक चौधरी) : नागपूर मुंबई महामार्गावर जळगावात हरताळा फाटा इथं एका कारने चौघांना उडवल्याची घटना घडलीय. राँग साइडने आलेल्या कारनं धडक दिल्यानं चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या कारला दोन नंबर प्लेट आहेत. अपघातानंतर कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com