Medicine Price Hike: आता औषधंही महागणार! नेहमीच्या औषधांसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे

महागाईचा आणखी एक जोरदार झटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
Medicine Price Hike
Medicine Price Hike esakal

Essential medicine price hike: महागाईचा आणखी एक जोरदार झटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यानुसार, अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ होणार असून यामध्ये नेहमीच्या औषधांचा समावेश आहे. १ एप्रिल २०२३ पासून औषधांच्या किंमतीत १२ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

Medicine Price Hike
Mantralay News: मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांपैकी एकीचा मृत्यू!

औषधांच्या किंमती वाढणार आहेत त्यामध्ये पेनकिलर्स, अँटिबायोटिक्स तसेच हृदयविकारासंबंधींच्या औषधांचा समावेश आहे. येत्या १ एप्रिलपासून या औषधांच्या किंमती वाढणार आहेत. केंद्र सरकारनं औषध कंपन्यांच्या वार्षिक होलसेल किंमत निर्देशांक (WPI) बदलानुसार दरवाढीला परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रीय औषध किंमत नियामक ऑथरिटीनं सोमवारी सांगितलं की, "सरकारद्वारे अधिसुचित WPI मध्ये वार्षिक बदल २०२२ च्या आधारे किंमती वाढू शकतात. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर औषध कंपन्यांनी देखील औषधांच्या किंमती वाढवण्याची मागणी करत आहेत"

Medicine Price Hike
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ठरले संकटमोचक!, महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली

औषधांचे दर किती वाढणार?

एका अहवालानुसार, औषधांच्या किंमती १२ टक्क्यांहून अधिक वाढू शकतात. हे सलग दुसरं वर्ष आहे ज्यामध्ये औषधांच्या किंमती वाढणार आहेत. शेड्यूल ड्रग्जच्या किंमतीत सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. शेड्यूल ड्रग्ज म्हणजे अशी औषध ज्यांच्या किंमतींवर सरकारचं नियंत्रण असतं, त्यामुळं सरकारच्या परवानगी शिवाय या प्रकारच्या औषधांच्या किंमती वाढू शकत नाहीत. WPI नुसार, गेल्या काही वर्षांत औषधांच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली होती, ती १ ते २ टक्के अशी होती.

औषध उद्योगाला मिळणार दिलासा

औषधांच्या किंमतीत वाढ झाल्यास या क्षेत्राशी संबंधित इतर व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही काळापासून औषध बनवण्याचा कच्चा मालाचे व्यापारी तसेच औषधांच्या पॅकेजिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक आणि पॅकेजिंगच्या साहित्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळं या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळं औषधांच्या किंमती वाढल्यास या लोकांना दिलासा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com