esakal | राज्य आणि केंद्रशासित प्रदेश समृद्ध परंपरेचे वारस
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य आणि केंद्रशासित प्रदेश समृद्ध परंपरेचे वारस

या सर्व ठिकाणच्या जनतेला ट्वीटरवरून शुभेच्छा देताना नायडू यांनी, ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश भारताच्या समृद्ध परंपरेचा आणि भौगोलिक वैविध्याचा ठेवा आहेत, अशी भावना व्यक्त केली.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेश समृद्ध परंपरेचे वारस

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना अथवा निर्मिती दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाना, छत्तीसगड, केरळ आणि आंध्र प्रदेश, पंजाब या राज्यांचा तर, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना अथवा निर्मिती दिन आहे. या सर्व ठिकाणच्या जनतेला ट्वीटरवरून शुभेच्छा देताना नायडू यांनी, ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश भारताच्या समृद्ध परंपरेचा आणि भौगोलिक वैविध्याचा ठेवा आहेत, अशी भावना व्यक्त केली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंतप्रधानांनी अनेक ट्वीट करताना प्रत्येक वरील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील वैशिष्ट्यांचा उल्लेख करत जनतेला शुभेच्छा दिल्या. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा