
सोशल मीडियावर सातत्याने व्हिडीओ, फोटो आणि मिम्स कोणत्यातरी गोष्टीमुळे चर्चेत येतात आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
एझॉल: सोशल मीडियावर सातत्याने व्हिडीओ, फोटो आणि मिम्स कोणत्यातरी गोष्टीमुळे चर्चेत येतात आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. काही लोक सोशल मीडियामुळे रातोरात स्टार किंवा सेलिब्रिटी होऊन जातात. पण सध्या सोशल मीडियावर एका चार वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून तिचं कौतूकही केलं जात आहे. हा व्हिडिओ इतका सुंदर आहे की यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही या मुलीचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही.
ईशान्य भारतातील मिझोरम या राज्यातील एस्तेर हंमटे (Esther Hnamte) या चार वर्षाच्या मुलीने 'वंदे मातरम' हे गीत गायलं आहे. या गीताचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एस्तेराच्या मधूर आवाजात गायलेल्या गाण्याचा व्हिडिओचं सोशल मिडियावर मोठं कौतुक होत आहे.
Adorable and admirable! Proud of Esther Hnamte for this rendition. https://t.co/wQjiK3NOY0
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2020
ज्यावेळेस हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तसा तो सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होण्यास सुरु झाला. पंतप्रधान मोदींनीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर ट्विट करून लिहलं आहे की, 'प्रेमळ आणि कौतुकास्पद! हे ऐकून एस्तेर हंमटेचा अभिमान वाटतोय.'
एस्तेरचा या व्हिडिओने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. त्याचा प्रत्यय सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्समधून दिसत आहे. जोरमथांगा ने ट्विटरवर एस्तेर हंमटेचा हा व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओची लिंकही पोस्ट केली आहे.
(edited by- pramod sarawale)