सगळ्यांना होणार ओमिक्राॅनची बाधा,बूस्टर डोसही थांबवू शकणार नाही संसर्ग

ओमिक्राॅन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने बाधित होणाऱ्यांची संख्याही जगभरात वाढली आहे.
Omicron Cases
Omicron Casesesakal

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. दुसरीकडे ओमिक्राॅन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने बाधित होणाऱ्यांची संख्याही जगभरात वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशात तातडीने १५-१८ वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांपुढील नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. पण हा बूस्टर डोसही ओमिक्राॅनची (Omicron) बाधा होण्यापासून रोखू शकणार नाही, असे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. आयसीएमआर(ICMR) च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलाॅजीतील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलीईल (Jayprakash Muliyil) म्हणाले, कोरोना (Corona) हा धोकादायक आजार राहिलेला नाही. (Everyone Get Infect Omicron Variant Despite Boosters Dose,Said Medical Expert Jayaprakash Muliyil)

Omicron Cases
सावधान ! अमेरिकेत एकाच दिवशी १० लाखांपेक्षा अधिक जण कोरोनाबाधित

नवीन स्ट्रेनचा परिणाम बराच कमी असून फारच कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमिक्राॅनचा आपण सामना करु शकतो. अनेकांना आपल्याला बाधा झाल्याचेही समजणार नाही. शक्यतो ८० टक्क्यांहून अधिक लोकांना समजणार नाही की आपल्याला कधी ओमिक्राॅनची बाधा झाली, असे मुलीईल यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले. कोणत्याही आरोग्यविषयक समितीने बूस्टर डोसची शिफारस केलेली नाही. त्याने या ओमिक्राॅनची नैसर्गिक वाढ थांबणार नाही. बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या कोरोना चाचणीला त्यांनी विरोध केला आहे. या विषाणूचा संसर्ग दोन दिवसांत दुप्पट होत असल्याने कोरोना चाचणीचा (Corona Test) अहवाल येईपर्यंत बाधितांमुळे अनेक जणांना संसर्ग होऊ शकतो. मग अशा स्थितीत चाचणी करण्याचा उपयोग होणार नाही.

Omicron Cases
कोरोना कमकुवत होतोय? ओमिक्रॉनमुळे सामान्य आजाराचं येणार रुप - EU

त्यामुळे कोरोनाच्या प्रसारावर फरक पडणार नाही, असे जयप्रकाश म्हणतात. लाॅकडाऊनबाबत ते म्हणतात, की आपण फार काळ घरात राहू शकत नाही. तसेही ओमिक्राॅनचा प्रभाव डेल्टा प्रकारापेक्षा खूप सौम्य आहे. दुसरीकडे सुरुवातीला कोरोना लस येईपर्यंत देशात जवळपास ८५ टक्के भारतीय संक्रमित झाले होते. या स्थितीत लसीचा पहिला डोसा हा पहिल्या बूस्टर डोसप्रमाणे होता. कारण बऱ्याच भारतातील लोकांमध्ये नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com