सावधान ! अमेरिकेत एकाच दिवशी १० लाखांपेक्षा अधिक जण कोरोनाबाधित | Covid Cases In America | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सावधान ! अमेरिकेत एकाच दिवशी १० लाखांपेक्षा अधिक जण कोरोनाबाधित

न्यूयाॅर्क : अमेरिकेत एकाच दिवशी जवळपास दहा लाख दहा हजार इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना सोमवारी (ता.दहा) कोरोनाची लागण झाली आहे. राॅयटर्स (Rauters) या वृत्तसंस्थेनुसार आतापर्यंत जगात एकाच दिवशी एवढी मोठी रुग्णसंख्या नोंदविली गेली आहे. वेगाने वाढणाऱ्या ओमिक्राॅन (Omicron) व्हेरिएंटचा प्रसार कमी झाल्याचे दिसत नाही. पूर्वी रुग्णसंख्या वाढीचा विक्रम दहा लाख ३ हजार इतका ३ जानेवारीला नोंदविला गेला. मोठी रुग्णसंख्या प्रत्येक सोमवारी नोंदवली जाते. कारण अनेक राज्ये आठवड्याच्या शेवटी रुग्णसंख्या नोंदवित नाहीत. सात दिवसांची सरासरी काढल्यास दोन आठवड्यात तिप्पट कोरोनाबाधितांची (Covid19 Cases In America) संख्या वाढली आहे. जवळपास सात लाख नवीन बाधित एका दिवसात होत आहेत. सर्व राज्यांनी सोमवारी रुग्णसंख्या नोंदवली नाही आणि त्यामुळे शेवटचा आकडा यापेक्षा अधिक असू शकतो.(US Reports 1.1million Covid19 Cases In A Day)

हेही वाचा: चुकीचे चित्र सादर करण्याचे प्रयत्न,रशियाची भारतीय मीडियावर नाराजी

दवाखान्यात दाखल होणाऱ्या कोविड रुग्णसंख्या ही मोठी आहे. ही संख्या तीन आठवड्यात दुप्पट होतेय, असे राॅयटर्सच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. दुसरीकडे ओमिक्राॅन कमी धोकादायक दिसतोय. आरोग्य अधिकाऱ्यांनी इशारा दिलाय की संसर्गाचा वेग वाढत असल्यामुळे दवाखान्यांवर ताण येऊ शकतो. काहींनी तर रुग्णसेवा स्थगित केल्या असून वाढती रुग्णसंख्या कशी हाताळायचे आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आदींशी आरोग्य यंत्रणा तोंड देत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा: Omicron सौम्य? पाहा काय सांगतायत बाधित झालेले एम्सचे डॉक्टर

दुसरीकडे कर्मचारी, शिक्षक आणि बसचालक अनुपस्थित राहत आहेत. शिकागोने शिकवणी वर्ग सलग चौथ्या दिवशी रद्द केल्या आहेत. न्यूयाॅर्क शहराने तीन उपनगरीय रेल्वेलाईन्स स्थगित केल्या आहेत. कारण मोठ्या प्रमाणावर कामगार बाधित होत आहेत. प्रत्येक दिवशी सरासरी मृत्यूदर १,७०० इतका आहे. कोरोना लशीत नवीन बदल करण्याची गरज असून जे ओमिक्राॅनला टक्कर देऊ शकेल. फायझर कंपनीच्या सीईओने सोमवारी सांगितले, की कंपनी येत्या मार्चमध्ये तशी लस आणेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :covid19america
loading image
go to top