Mohan Bhagwat: "भारताची एकता आणि अखंडता कायम ठेवा"; भागवतांच्या कानपिचक्या

कोणीतरी यांना समजवायला हवं असंही यावेळी भागवत यांनी म्हटलं आहे.
Mohan Bhagvat
Mohan Bhagvat

नवी दिल्ली : भारताची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला हवेत अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाजपसह इतर नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. भागवतांच्या या विधानामुळं अनेक चर्चाही सुरु झाल्या आहेत. (Everyone should make efforts for India unity and integrity says Mohan Bhagwat)

संघाच्या एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, "संपूर्ण जगात इस्लामंच आक्रमण झालं, स्पेनपासून मंगोलियापर्यंत हा धर्म पसरला. हळू हळू तिथले लोक जागे झाले त्यांनी आक्रमणकाऱ्यांचा पराभव केला, त्यामुळं इस्लामची पिछेहाट झाली.

सर्वांनी सर्वकाही बदलून टाकलं. आता विदेशी तर भारतातून निघून गेले पण इस्लामची पुजा सुरक्षित कुठे चालते ती इथेच चालते. किती शतकं झाली हे सहजीवन सुरु आहे. हे न ओळखता आपली भेदभेवांची निती चालवत असाल तर असं कसं चालेल" (Marathi Tajya Batmya)

Mohan Bhagvat
Raj Thackeray: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, उद्या रायगडावर...

कोणीतरी यांना समजवायला हवं ना. जर त्यांना पक्क हे समजलं असतं तर आम्ही वेगळे दिसतो म्हणून वेगळो आहोत या विचारानं देश तुटला नसता. सर्वांना हे कळणं गरजेचं आहे. ही मातृभूमी आमची आहे हे विसरुन आमच्या पुजा वेगवेगळ्या आहेत.

यामध्ये दोन चार विदेशी देखील आहेत. तरी देखील एका समाजाच्या नात्यानं आपण या देशाचे आहोत. आपले पूर्वज या देशाचे पूर्वज राहिले आहेत. या वास्तविकतेला आपण का स्विकार करु शकत नाही.

आपली जी विशिष्टता आणि विविधता आहे. ते आपल्या वेगळेपणाचं कारण बनत नाही इतर जगात ती होऊ शकते. आपल्या देशात प्राचीन काळापासून सर्वांना समन्वयानं सोबत घेऊन जाणारी संस्कृती कार्यरत आहे, असंही भागवत यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com