"EVMच्या चर्चेत आता दम नाही"; NCPच्या माजी खासदाराकडून मोदींचं कौतुक

एकेकाळी राष्ट्रवादीच्या या वरिष्ठ नेत्याकडून मोदींवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात होती.
Narendra Modi
Narendra Modiसकाळ डिजिटल टीम
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या कारभारावर ऐकेकाळी टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी खासदार माजी मेमन (Majeed Memon) यांनी आता मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींमध्ये असे गुण आहेत जे विरोधकांमध्ये नाहीत. जर लोकांची मत जिंकत ते जगातील लोकप्रिय नेते म्हणून पुढे येत असतील तर त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी खास गुण असतील, असंही मेमन यांनी म्हटलं आहे. (EVM discussion is no longer breathless Former NCP MP Majid Memon praises PM Modi)

नुकत्याच झालेल्या पाच विधासभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेला जनादेशामुळं भाजपला मिळालेल्या बंपर विजयावरुन मेमन यांनी मोदींचं खूपच कौतुक केलं आहे. ते म्हणाले, ही विचार करण्यासास भाग पाडणारी गोष्ट आहे की, संविधानाचं उल्लघंन करुन, लोकांमध्ये द्वेष पसरवून तसेच समाजामध्ये फूट पाडल्यानंतरही ते कसं काय जिंकतात?. सुरुवातीला विरोधकांनी ईव्हीएममध्ये हेराफेरी झाल्यानं मोदी जिंकतात असं म्हटलं होतं पण आता ही चर्चा टिकू शकत नाही.

ऐकेकाळी मोदींविरोधात आक्रमक होते मेमन

एप्रिल २०१९ रोजी माजित मेमन यांनी एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी एक अशिक्षित, मूर्ख आणि रास्त्यावरच्या माणसाप्रमाणं बोलत असतात. ते इतक्या मोठ्या पदावर बसले आहेत, त्याचं पद हे संविधानिक पद आहे. अशा पदावर बसेलल्या व्यक्तीला रस्त्यावरुन निवडून आणलं जात नाही. २०१४ मध्ये असं होतं नव्हतं, २०१९ मध्येही असं होणार नाही, हे त्यांना कळायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com