
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवृत्तीच्या आठ महिन्यानंतरही दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा केलेला नाही. या पार्श्वभूमीवर न्यायालय प्रशासनाने केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाला पत्र पाठवत ५, कृष्ण मेनन मार्गावरील बंगला रिकामा करून घ्यावा, अशी सूचना केली आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये चंद्रचूड हे सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीनंतरही ते या बंगल्यात राहत आहेत.