paper leak
paper leak

Gujarat : मोदींच्या गुजरातमध्ये 'पेपर लीक'! ज्युनियर क्लार्क पदाची भरती परीक्षा अखेर रदद्

अहमदाबाद - गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाने (जीपीएसएसबी) पेपर फुटल्यामुळे कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीची परीक्षा रद्द केली आहे. ही परीक्षा आज राज्यातीव ३ हजार ३५० ठिकाणी होणार होती. 3 लाख 350 हजारांहून अधिक तरुण परीक्षा देणार होते, मात्र अचानक पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातही पेपर लीक होण्याची घटना घडली.

paper leak
Pune Election : चिंचवडमध्ये भाजपचं ठरलं? शंकर जगताप-फडणवीस यांच्या भेटीने चर्चांना उधाण

या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक केल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरपरीक्षा कधी होणार याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. परीक्षा रद्द झाल्याने लाखो तरुणांची निराशा झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षा पे चर्चामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं. मात्र त्यांच्याच राज्यात पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे.

गुजरात एटीएस गेल्या तीन-चार दिवसांपासून पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित लोकांवर लक्ष ठेवून होती. वडोदरा येथून १५ आरोपींना प्रश्नपत्रिकांसह अटक करण्यात आली आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं एसपी सुनील जोशी सांगितलं.

paper leak
Supriya Sule : "लव्हचा अर्थ मला कळतो जिहादचा..."; हिंदूंच्या मोर्चावर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

गुजरात एटीएसचे एसपी सुनील जोशी यांनी सांगितले की, गुजरात एटीएस गेल्या 3-4 दिवसांपासून पेपर लीक प्रकरणाशी संबंधित लोकांवर लक्ष ठेवून होती. वडोदरा येथून १५ आरोपींना प्रश्नपत्रिकांसह अटक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com