जालन्याच्या छापेमारीनंतर ओडिसात मराठी व्यक्तीवर कारवाई; वाचा काय घडलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जालन्याच्या छापेमारीनंतर ओडिसात मराठी व्यक्तीवर कारवाई; वाचा काय घडलं

जालन्याच्या छापेमारीनंतर ओडिसात मराठी व्यक्तीवर कारवाई; वाचा काय घडलं

एकीकडे जालना आणि औरंगाबाद येथे आयकर विभागाने छापेमारी करत 390 कोटींचं घबाड जप्त केले आहे. याची चर्चा सुरू असतानाचा आता ओडिसा येथे उत्पादन विभागाने एका मराठी व्यवयायिकावर कारवाई करत त्याच्याकडून 1.22 कोटींची रोकड जप्त केली आहे. याशिवाय या व्यापाऱ्याकडून 20 सोन्याची बिस्किटेदेखील जप्त करण्यात आली आहे. गंजम जिल्ह्यातील महामार्गावर 9 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत एएनआयने ट्वीट केले असून यामध्ये ओडिसा येथे केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातील एका व्यावसायिकाकडून 1.22 कोटींची रोख आणि 20 सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. गंजम जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लांजीपल्ली येथील महामार्गावर 9 ऑगस्ट रोजी रात्रीच्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे.

सध्या उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांजाच्या तस्करीबाबत धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाईदरम्यान, अधिकाऱ्यांनी या व्यावसायिकाकडून वरील मुद्देमाल जप्त केला असून, कारावाई केलेली व्यक्ती ड्रग्ज डिलर असून. ती महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. मात्र, ती नेमकी कोण याची कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.

राज्यात जालन्यातील छापेमारीची चर्चा

दरम्यान, आयकर विभागाने जालना आणि औरंगाबाद येथे एका स्टील कंपनी आणि बिल्डरवर छापेमारी करत 390 कोटींचं घबाडं जप्त केले आहे. या कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी अतिशय चोख गुप्तता पाळली होती. तसेच याबाबत कुणालाही काही थांगपत्ता लागू नये यासाठी गाड्यांवर हे सर्व वऱ्हाडी असल्याचे भासवले. यासाठी गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे असा मजकूर असलेले स्टीकर लावण्यात आले होते. या कारवाईनंतर फिल्मी स्टाईलने टाकलेल्या या छापेमारीची राज्यात सर्वदूर जोरदार चर्चा सुरू आहे.