esakal | Exit Polls In Assam: भाजपचाच वरचष्मा; सत्ता राखणार; असे आहेत आकडे

बोलून बातमी शोधा

Exit Polls In Assam: भाजपचाच वरचष्मा; सत्ता राखणार; असे आहेत आकडे
Exit Polls In Assam: भाजपचाच वरचष्मा; सत्ता राखणार; असे आहेत आकडे
sakal_logo
By
टीम ई सकाळ

गुवाहाटी : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. आज 29 एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यात तर पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये या निवडणुका झाल्या असून त्यांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. पण त्याआधी कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाने बाजी मारली आहे, यासंदर्भातील एक्झिट पोलचे आकडे आता समोर येत आहेत. 27 मार्चला पाच राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती. तर केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये 6 एप्रिल रोजी झालेल्या तिसर्‍या टप्प्यात सर्वच जागांसाठी एकाच दिवशी मतदान झाले होते. आसाममध्ये 126 जागांसाठी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. तीन टप्प्यांमध्ये या निडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात 27 मार्च, दुसऱ्याच टप्प्याचं मतदान 1 एप्रिल रोजी आणि तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिल रोजी झालं. 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

हेही वाचा: पश्चिम बंगालमध्ये आज अखेरच्या आठव्या टप्प्याचे मतदान

2016 साली झालेल्या निवडणुकीत भाजप पक्षाला 60 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 26 जागा मिळाल्या होत्या. All India United Democratic Front ला 13, Asom Gana Parishad ला 14, Bodoland Peoples Front ला 12 तर अपक्ष उमेदवाराला 1 जागा मिळाली होती. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, यावेळी आसाममध्ये भाजपला 75 - 85 जागा मिळतील. काँग्रेसला 40-50 तर इतर पक्षांना 1-4 जागा मिळतील असा अंदाज आहे.