

vistadome jungle safari tiger reserve dudhwa.jpg
sakal
Dudhwa Tiger Reserve Train Safari : भारताच्या पर्यटनात एक नवा अध्याय जोडत, उत्तर प्रदेश सरकारने दुधवा व्याघ्र प्रकल्प आणि कतर्नियाघाट अभयारण्याच्या मधून धावणारी 'विस्टाडोम जंगल सफारी' रेल्वे सुरू केली आहे. जीप सफारीच्या धुळीपासून दूर, वातानुकूलित डब्यात बसून जंगलाचा ३६०-डिग्री व्ह्यू देणारी ही देशातील पहिलीच आगळीवेगळी रेल्वे सफारी ठरली आहे. विशेषतः निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी ही ट्रेन म्हणजे एक चालते-फिरते 'व्ह्यूईंग डेक' आहे.