INS विक्रांत भारतीय नौदलाच्या साठी सर्वात महत्वाची का आहे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ins vikrant

INS विक्रांत भारतीय नौदलाच्या साठी सर्वात महत्वाची का आहे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी भारतीय बनावटीची स्वदेशी आयएनएस विक्रांतचा ताफ्यात समावेश झाला आहे. आता भारतीय नौदलाची ताकत वाढली आहे. आयएनएस विक्रांतचे वजन 44 हजार टन आहे. आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युध्दनौका कोचीत शिपयार्डने शुक्रवारी भारतीय नौदलाकडे सुपूर्त केली आहे.

ही नौका 76 टक्के भारतीय बनावटीची आहे. ही बनावण्यासाठी 'मेक इन इंडिया' अंतर्गत साहित्याचा पुरवठा केला होता. ही बनवताना अनेक आव्हानांचा सामना करत ही बनावली आहे. या विमानवाहू नौकेमुळे भारताची ओळख आता इतर देशांसारखी होणार आहे. जगभरात काही मोजकेच देश युध्दनौका तयार करतात. आता त्या यादीत भारताचा देखील समावेश होणार आहे.

हेही वाचा: कोरोनानंतरही लोकांना मोफत धान्य मिळणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

भारताकडे सध्या एकच विमानवाहू नौका आहे. आणि तिही रशियन बनावटीची आहे, तिच नाव आयएनएस विक्रमादित्य आहे. भारताला लाभलेला चौकडून सागरी समुद्र आणि त्या मार्गाने भारतावर समोर आसलेली चीन,पाकिस्तान कडूनची आव्हाने पेलण्यासाठी विक्रांत प्रभावी ठरणार आहे. आशातच वारंवार तीन विमानवाहूची गरज असल्याचे सांगितल जात होते.

आयएनएस विक्रांतच्या समावेशाने दोन्ही विभागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने एक विमानवाहू नौका तैनातीची गरज पूर्ण होईल. विमानवाहू नौकेसोबत क्षेपणास्त्र आणि इतर सुसज्ज विविध युद्धनौका, पाणबुडी, इंधन पुरविणारे जहाज आदींचा ताफा असतो. समुद्रातून होणाऱ्या हल्ल्यांपासून युध्दनौकांचे संरक्षण करण्यासाठी ही विमानवाहू नौका वरदान ठरणार आहे. आयएनएस विक्रांत सुरुवातीला नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाकडे राहणार आहे.

हेही वाचा: तरुणींसोबत काका नाचण्यात गुंग, काकुनं चपलेनं उतरवला रंग

ही विमानवाहू नौका वायूतंत्रज्ञानावर आधारित आहे. आणि तिचे वजन सुमारे 44 हजार टन आहे, तिला संयुक्त टर्बाईन प्रणालीतुन 80 मेगावॉट वीज मिळते. ती नौका ताशी 28 किलो मिटर सागरी वेगाने धावते, सामान्य स्थितीत 18 सागरी किलो मीटर वेगाने प्रवास करेल. त्यामुळे 8000 हजार किलो मीटरचे अंतर पार करू शकेल. तिची लांबी 262 मीटर आहे, रूंदी 62 मीटर, तर उंची 59 मीटर आहे, असे तिचे रूप आहे. नौकेचे पृष्ठ भागाचे क्षेत्र खुप मोठे आहे. 1700 जवानांच्या चालक दलास आग्रस्थानी ठेवून 2300 वेगवेगळे कप्पे देखील तयार करण्या आहे आहेत. यामध्ये महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

या विमानवाहू नौकेसाठी खास लढाऊ व्यवस्थापन प्रणालीही देशातच विकसित करण्यात आली. जमिनी वरून हवेत मारा करणारे बराक हे क्षेपणास्त्र एका मिनिटात 120 गोळा झाडणारी बंदूक हवाई हल्ल्यांपासून पूर्वसूचना देणारी यंत्रणा, दिशा दर्शनासाठी बहुपर्यायी व्यवस्था, अशा अनेक यंत्रणांचा अंतर्भाव आहे. शत्रुच्या रडारवर यंत्रणेची दिशाभूल क्षमता तिच्यात आहे.

साधारण 30, कमी वजनांच्या विमानांचा ताफा तिच्यावर तैनात असणार आहे. सध्या नौकेवर रशियन बनावटीचे मिग-29, कामोव्ह-31, स्वदेशी बनावटीचे प्रगत हलके हेलिकॉप्टर कार्यरत आहे. 26 बहुउद्देशिय लढाऊ विमाने खरेदीचा विचार सुरू आहे. त्या अनुषंगाने अलीकडेच फ्रान्सच्या राफेल –एम आणि अमेरिकन बोईंगच्या एफ ए- 18 हॉर्नेट विमानांच्या चाचण्याही पार पडल्या.

विक्रांतमुळे देशाने जहाज बांधनीचा मोलाचा तुरा गाठला आहे. ही नौका 76 टक्कयांपेक्षा जास्त साहित्य आणि उपकरणे स्वदेशी आहेत. या मध्ये 21 हजार 500 टन विशेष धातू तयार करून प्रथमच विक्रांत मध्ये वापरले आहे. विक्रांतची किंमत सुमारे 20 कोटीच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Explained Vikrant Handed Over Indian Navy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..