लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजुरांच्या स्थलांतराला कारणीभूत कोण? गृहमंत्रालयाने लोकसभेत दिली माहिती 

टीम ई-सकाळ
Tuesday, 15 September 2020

कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रवासी कामगारांचे स्थलांतर झाले होते. हे स्थलांतर होत असताना अपघात होऊन अनेक कामगारांना आपला जीव देखील गमवावा लागला होता.

कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रवासी कामगारांचे स्थलांतर झाले होते. हे स्थलांतर होत असताना अपघात होऊन अनेक कामगारांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. तर काही काळाने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या कामगारांच्या स्थलांतरामुळे देशभरात मोठी समस्या उद्भवल्याचे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र कामगारांच्या या स्थलांतरामागचे कारण फेक न्यूज असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने आज सांगितले. 

प्रवासी मजुरांच्या मृत्यूची आकडेवारीच नाही तर नुकसान भरपाईचा प्रश्न येतोच कुठे...

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज लोकसभेत फेक न्यूजमुळे लॉकडाउनच्या काळात अस्थायी कामगारांनी मोठ्या संख्येने स्थलांतर केल्याचे सांगितले. कामगार अन्न, पाणी, आरोग्य सेवा आणि निवासासंदर्भातील मूलभूत गरजांविषयी चिंतीत असल्यामुळे त्यांनी आपल्या मूळ ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लॉकडाउन मध्ये असंघटित मजुरांच्या स्थलांतराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, केंद्र सरकार त्याबद्दल पूर्णपणे जागरूक होती. आणि या कालावधीत प्रवासी मजूर, कामगारांसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या गेल्याचे सांगितले.  

याशिवाय, गृह मंत्रालयाने लॉकडाउन मध्ये स्थलांतरित मजुरांच्या समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मंत्रालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यासह अनेक उपाययोजना केल्याचे सांगितले. नित्यानंद राय यांनी दिलेल्या लेखी उत्तरात, नियंत्रण कक्षातून स्थलांतरित कामगारांसह अडकलेल्या लोकांच्या तक्रारी दूर करण्यात आल्या असल्याचे सभागृहात सांगितले. यामध्ये अन्न, वाहतूक, निवारा इत्यादी तक्रारींचा समावेश असल्याचे सांगून, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हेल्पलाईन आणि कंट्रोल रूम सुरू करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राय यांनी यावेळेस सांगितले आहे. 

यावतिरिक्त, सर्व राज्यांना प्रवासी कामगारांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था, भोजन, कपडे, वैद्यकीय सेवा इत्यादी पुरवण्यासाठी केंद्र सरकारने राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) वापरण्याची परवानगी दिल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. तसेच देशात भविष्यातील गोंधळाची परिस्थिती रोखण्यासाठी काही तासांच्या अवधीतच देशव्यापी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

'गरजू देशांना आधी लस मिळणं महत्त्वाचं, भारताची भूमिका मोलाची असेल'

दरम्यान, काल केंद्र सरकारने 25 मार्चपासून राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये झालेल्या स्थलांतराच्या वेळेस किती प्रवासी कामगार मरण पावले याची माहिती नसल्याचे म्हटले होते.                


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Explanation of Union Home Ministry that Migration of migrant workers during lockdown due to fake news