Breaking : प्रजासत्ताकदिनीच आसाममध्ये बॉम्बस्फोट 

वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आसाममध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत. आसाममधील डिब्रूगडमध्ये दोन स्फोट घडले तर एक सोनारी येथे आणि दुसरा पोलिस स्टेशनजवळील दुलियाजन येथे घडला.

डिब्रूगड (आसाम) : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आसाममध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत. आसाममधील डिब्रूगडमध्ये दोन स्फोट घडले तर एक सोनारी येथे आणि दुसरा पोलिस स्टेशनजवळील दुलियाजन येथे घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आसाममधील डिब्रूगडमधील राष्ट्रीय महामार्ग 37 वर हे बॉम्बस्फोट झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिस आणि अन्य सुरक्षा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महंत यांनी सांगितले की, 'आम्हाला दिब्रूगडमधील स्फोटांची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून यात कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे.

पुण्यात सुरु झाले शिवभोजन केंद्र? पाहा कोठे?

तत्पूर्वी, या स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही. आज भारताच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: explosions rock Assam on Republic Day