esakal | अवघ्या 10 सेकंदात शोधता येणार स्फोटके; आयआयटीने विकसित केला 'नॅनो स्निफर'

बोलून बातमी शोधा

Explosives

नॅनो स्निफर हा अतिशय सूक्ष्म स्फोटकांचा शोध दहा सेकंदात घेतो आणि काही सेकंदात त्याचे विश्‍लेषणही करतो.

अवघ्या 10 सेकंदात शोधता येणार स्फोटके; आयआयटीने विकसित केला 'नॅनो स्निफर'
sakal_logo
By
संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : विमानतळ, रेल्वे आणि मेट्रो स्थानके, हॉटेल, मॉल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्फोटके असतील, तर ती अवघ्या दहा सेकंदात शोधता येतील. आयआयटी मुंबई आणि आयआयटी दिल्ली यांच्या सहकार्याने विकसित केलेला नॅनो स्निफर ही स्फोटके अचूकपणे सुरक्षा यंत्रणांना शोधून देईल. नॅनोस्निफ टेक्नोलॉजीज या स्टार्टअपने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ‘नॅनो स्निफर’चे विमोचन केले. स्फोटक शोधण्यासाठी जवळपास आवश्‍यक सर्व उत्पादने मोठी किंमत मोजून आयात केली जातात. त्यामुळे देशाला परकीय चलन गमवावे लागते. आता आयात उत्पादनांना नॅनो स्निफर योग्य पर्याय ठरणार आहे. नॅनो स्निफर हा अतिशय सूक्ष्म स्फोटकांचा शोध दहा सेकंदात घेतो आणि काही सेकंदात त्याचे विश्‍लेषणही.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सैन्यात वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक आणि देशी बनावटीच्या स्फोटकांचा धोका शोध हे उपकरकण शकते. त्यातील अल्गोरिदममुळे स्फोटकांचे विश्लेषण होत असल्यामुळे स्फोटकांचे योग्य श्रेणीत वर्गीकरण करण्यास देखील मदत होते. सूर्यप्रकाशात वाचता येईल अशा कलर डिस्प्लेसह दृश्य आणि ऐकू येतील असा इशारा हा नॅनो स्निफर देतो. पुण्यातील ‘डीआरडीओ’च्या उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेमध्ये (एचईएमआरएल) त्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाने (एनएसजी) देखील त्याची चाचणी घेतली आहे.
- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रमेश पोखरियाल म्हणाले, ‘‘नॅनो स्निफर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी भारताच्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल आहे. हे संशोधन, त्याचा विकास आणि उत्पादन हे पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ आहे. हे तंत्रज्ञान अमेरिका आणि युरोपमधील पेटंटद्वारे सुरक्षित आहे. या तंत्रज्ञानामुळे ‘एक्सप्लोसिव्ह ट्रेस डिटेक्टर’ या उपकरणांवरचे आपले इतर देशांवरील अवलंबत्व कमी होऊ शकेल. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान हे उत्पादन रुपात थेट बाजारपेठेत याचे हे परिपूर्ण उदाहरण आहे. यात आयआयटी मुंबई आणि आयआयटी दिल्ली यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.’’