जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत वाढ

वृत्तसंस्था
Friday, 28 June 2019

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढवण्याच्या प्रस्तावास लोकसभेत आज (शुक्रवार) मंजुरी मिळाली. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आता 3 जुलैपासून राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढवण्याच्या प्रस्तावास लोकसभेत आज (शुक्रवार) मंजुरी मिळाली. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आता 3 जुलैपासून राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आणखी सहा महिने राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत आज (शुक्रवार) सादर केला. लोकसभेत चर्चेदरम्यान शहा म्हणाले, 'जम्मू-काश्मीरमध्ये कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्याचा दावा करत नव्हते, तेव्हा राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर तेथील विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला. 9 सप्टेंबर 2018 रोजी राज्यपाल राजवटीचा कालावधी संपल्यानंतर त्याठिकाणी कलम 356चा वापर करून 20 सप्टेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2 जुलै रोजी हा सहा महिन्याचा अवधी संपत आहे. यामुळे आणखी 6 महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट सुरु ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.'

दरम्यान, अमित शहा यांच्या या प्रस्तावानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extend Presidents Rule in Jammu and Kashmir for a further period of 6 months