S Jaishankar: परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ; आयबीच्या इशाऱ्यामुळं दिली 'झेड' सुरक्षा

त्यांच्यासोबत आता २४ तास १४ ते १५ सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत.
S Jaishankar
S Jaishankaresakal

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यानुसार, ६८ वर्षीय जयशंकर यांच्या सध्याच्या वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करुन ती झेड सुरक्षा करण्यात येणार आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (External Affairs Minister S Jaishankar security cover has been upgraded to the Z category)

'झेड' सुरक्षा तैनात

केंद्रीय गृहमंत्रालयानं केंद्रीय राखीव पोलीस बलाला (सीआरपीएफ) त्यांची सुरक्षेची जबाबदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या त्यांची सुरक्षा दिल्ली पोलिसांच्या सशस्त्र टीमच्या हाती आहे. म्हणजेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन ती झेड दर्जाची करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

यानंतर त्यांच्यासोबत देशभरात चोवीस तास १४-१५ सशस्त्र कमांडो राहतील. सीआरपीएफचं व्हीआयपी सुरक्षा कवच सध्या १७६ जणांना देण्यात आलं आहेत. ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com