सावधान! गडगंज पगाराच्या नोकरीच्या अमिषाला बळी पडतायत भारतीय तरुण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ministry of External Affairs advises

सावधान! गडगंज पगाराच्या नोकरीच्या अमिषाला बळी पडतायत भारतीय तरुण

थायलंडमध्ये आयटी क्षेत्रातील जास्त पगाराच्या नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने भारतीय तरुणांना फसवणाऱ्या खोट्या ऑफरबाबत परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) मर्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आयटी क्षेत्राशी संबंधीत भारतीय तरुणांना दुबई आणि भारतातील एजंटांकडून सोशल मीडियावर जाहिराती देवून.

थायलंडमध्ये नोकरीच्या आकर्षक ऑफर देऊन फसवले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, कॉल-सेंटर घोटाळे आणि क्रिप्टो-चलन फसवणूकीत संशयित आयटी कंपन्यांद्वारे थायलंडमध्ये डिजिटल विक्री आणि मार्केटीक एग्जीक्यूटिव पदांची ऑफर करणाऱ्या बनावट जॉब रॅकेटचे काही कारनामे हे परराष्ट्रीय मंत्रालयाच्या निदर्शनात आले आहे. आणि त्याचा भाग बँकॉक आणि म्यानमार आहेत.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या रॅकेटमध्ये सामील असलेल्या पीडितांना बेकायदेशीरपणे सीमेपलीकडे म्यानमारमध्ये नेले जात आहे. आणि तेथे त्यांना कैदेत असलेल्या कठीण आणि धोकादायक वातावरणात काम करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना सल्ला देण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर स्त्रोतांद्वारे जारी केल्या जाणार्‍या अशा खोट्या नोकरीच्या ऑफरला बळी पडू नका. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना कोणत्याही नोकरीची ऑफर स्वीकारण्यापूर्वी त्या कंपनीच्या सर्व आधिकृत रित्या सर्व बाबी पाहूनच जाण्याचा निर्णय घ्यावा.

टॅग्स :IndiajobFake Currency