
एका महिलेचं आणि तरुणाचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून दोघांना पकडून खांबाला बांधण्यात आलं. यानंतर तरुणाला पोलिसांकडे सोपवण्याआधी त्याचं शुद्धीकरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. महिलेचं स्वामी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघांना एकत्र पकडल्यानंतर त्यांना खांबाला बांधून घालण्यात आलं होतं. तेलंगनाच्या सुल्तानाबादमध्ये ही घटना घडलीय.