Facebook Fuel For India 2020 :भारताच्या डिजीटल भविष्याबाबत अंबानी-झुकेरबर्ग यांच्यात संवाद

mark zuckerberg mukesh ambani
mark zuckerberg mukesh ambani

नवी दिल्ली : दोन दिवसीय फेसबुक 'फ्यूअल फॉर इंडिया 2020' या कार्यक्रमाची सुरवात आज 15 डिसेंबरपासून झाली आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच मार्क झुकेरबर्ग आणि मुकेश अंबानी भारताच्या आर्थिक वृद्धीला गतीमान करण्यामध्ये डिजीटलायझेशनच्या भुमिकेवर चर्चा करत आहेत. या दरम्यान मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटलं की, आम्ही मागच्या महिन्यात भारतात व्हाट्सएप लाँच केलं होतं. UPI सिस्टीम आणि 140 बँकांमुळे हे शक्य झालं, ज्यामुळे हे अधिक सोपं झालं. असं करणारा भारत पहिला देश आहे. 

हा इव्हेंट भारताच्या विकासाच्या गतीस अधिक पुढे नेण्यासाठी इंधनाचेच काम करेल. भारतामध्ये आपल्या अधिक गुंतवणुकीची आम्ही अपेक्षा करत आहोत. मी आशा करतो की भारताच्या धोरणांकडे पाहून उर्वरित जग काही शिकेल. असं भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना उद्देशून म्हटलं. आपल्या पार्टनरशिपमध्ये तुम्ही जे काही करता त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी आपला आभारी आहे, असं मार्क झुकेरबर्ग याने म्हटलं.
यावर्षी एप्रिलमध्ये फेसबुकने 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक Jio प्लॅटफॉर्ममध्ये करण्याची घोषणा केली होती. फ्यूअल फॉर इंडिया 2020 वेबसाईटवर म्हटल्याप्रमाणे, फ्यूअल फॉर इंडिया 2020 हे फेसबुकच्या भारताबद्दलच्या वचनबद्धतेसाठी तयार केलेल्या वार्षिक संवादाची पहिली आवृत्ती आहे.

फेसबुकचा प्रमुख मार्क झुकेरबर्ग आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याशिवाय फेसबुकचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर शेरिल सँडबर्ग, इन्स्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी, व्हाट्सएपचे प्रमुख विल कॅथकार्ट देखील या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. फेसबुक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित मोहन यांनी या इव्हेंटबाबत म्हटलं की, आम्ही भारतामध्ये फेसबुकची खरी कहानी शेअर करु इच्छितो, ज्यामुळे लोकांना हे समजण्यास सोपं  पडेल की आमच्या प्लॅटफॉर्मचे युझर्स आणि संस्थाच्या द्वारे आम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com