esakal | #ResignModi हॅशटॅग कसा झाला ब्लॉक; फेसबुकने दिलं स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

PM Modi

फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करत असलेला हॅशटॅग ट्रेंड होत होता.

#ResignModi हॅशटॅग ब्लॉक का केला? फेसबुकने दिलं स्पष्टीकरण
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली - भारतात कोरोनाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. तर काही ठिकाणी बेड्, रेमडेसिव्हिरची कमतरता जाणवत आहे. यामुळे सोशल मीडियावर सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारकडून मदत दिली जात नसल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींवरही टीका करण्यात येतेय. यात सोशल मीडीयावर ट्रेंडही सुरु झाले असून यातील काही ट्रेंड ब्लॉक करण्यात आले. फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करत असलेला हॅशटॅग ट्रेंड होत होता. #ResignModi असा हॅशटॅग वापरून टीका केली जात होती. नंतर फेसबुककडून हा टॅग ब्लॉक केल्यानंतर युजर्सनी फेसबुकवर पक्षपातीपणाचा आरोप केला. आता यावर फेसबूकने आपली चूक होती म्हणत हॅशटॅगचे ब्लॉक काढले आहे.

फेसबुकने हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर युजर्सनी #ResignModi सर्च केलं. मात्र युजर्सना कम्युनिटी स्टँडर्डचं उल्लंघन होत असल्याचं नोटिफिकेशन दाखवत होतं. यामध्ये ‘आमच्या कम्युनिटी स्टँडर्ड्सचं या पोस्टमुळे उल्लंघन होत असल्यानं त्या ब्लॉक केल्या आहेत.’ असं नोटिफिकेशन युजर्सना दाखवलं. त्यानंतर अनेकांनी याबाबत ट्विटरवरून ट्रेंड सुरु केला. तसंच हॅशटॅग ट्रेंड ब्लॉक करणं म्हणजे आवाज दाबण्याचा प्रकार आहे असं सांगत युजर्सनी लोकशाहीला धोका आहे असंही म्हटलं.

फेसबुकने स्पष्टीकरण देताना म्हटलं की, हॅशटॅग आमच्याकडून चुकून ब्लॉक झाला होता. त्यासाठी भारत सरकारने आम्हाला कोणतीही सूचना दिली नव्हती. आता हॅशटॅग पुन्हा अॅक्टिव्ह झाला आहेय फेसबुक कम्युनिटी स्टँडर्डचे उल्लंघन करणारे हॅशटॅग ब्लॉक करतं. ब्लॉक करण्याची ही सिस्टिम मॅन्युअली आणि ऑटोमॅटीक असते. यासाठी काही गाईडलाइन्स फेसबुकने ठरवल्या आहेत. ट्रेंड होत असेलेल्या हॅशटॅगमध्ये लेबलशी संबंधित एरर आला होता त्यामुळे ब्लॉक झाला असंही कंपनीने स्पष्ट केलं. फेसबुकनं हॅशटॅग ब्लॉक करण्याआधी मंगळवारी ट्विटरवर मोदींविरोधात ट्रेंड सुरु होता. त्यामध्ये #FAILEDMODI हा ट्रेंड ट्विटरवर टॉप होता.