'या' लाकडापासून बनवली जाते जगन्नाथची मूर्ती, झाडाजवळ असावी लागते स्मशानभूमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'या' लाकडापासून बनवली जाते जगन्नाथची मूर्ती, झाडाजवळ असावी लागते स्मशानभूमी

भगवान जगन्नाथाच्या मूर्तीसाची निवड करताना काही विशेष गोष्टींचीही काळजी घेतली जाते.

'या' लाकडापासून बनवली जाते जगन्नाथची मूर्ती, झाडाजवळ असावी लागते स्मशानभूमी

दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयेला ओडिसातील पुरी येथे भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढली जाते. यंदा ही रथयात्रा ४ जुलैपासून सुरू होणार आहे. दरम्यान, या रथयात्रेतून भगवान जगन्नाथ, बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा या देवतांच्या तीन वेगवेगळ्या मू्र्ती दिव्य रथांवरून शहरात नेल्या जातात.

जगन्नाथाची मूर्ती कधी बदलली जाते?

जेव्हा आषाढाचे दोन महिने येतात म्हणजेच आषाढासह अधिक महिना येतो, त्यावर्षी भगवान जगन्नाथ आणि देवांच्या मूर्ती बदलल्या जातात. हा योग साधारण 19 वर्षांतून एकदा येतो. या प्रसंगाला नव-कलेवर असं म्हटंल जातं. भगवान जगन्नाथाच्या मूर्तीसाची निवड करताना काही विशेष गोष्टींचीही काळजी घेतली जाते. खालीलप्रमाणे..

हेही वाचा: इस्त्रोने PSLV-C53/DS-EO मिशनचे केले यशस्वी प्रक्षेपण

  • भगवान जगन्नाथ आणि इतर देवतांच्या मूर्ती या कडुलिंबाच्या लाकडापासून बनवल्या जातात. भगवान जगन्नाथाचा सावळा रंग असल्याने कडुलिंबाचे झाडही त्या रंगाचे असावे लागते.

  • या कडुलिंबाच्या झाडाला चार प्रमुख फांद्या असाव्या लागतात.

  • कडुलिंबाच्या झाडाजवळ एखादा (तलाव) किंवा स्मशानभूमी असणे आवश्यक असते.

  • झाडाच्या मुळाशी सापाचे बिळही असावे असे सांगितले जाते.

  • हे बीळ रस्त्याच्या जवळ किंवा तीन पर्वतांनी वेढलेले असावे लागते.

  • झाडाजवळ वरुण, सहदा, आणि बेलाचे झाड असावे, असंही सांगितले जाते.

2 किलोमीटरची असते रथयात्रा

ही रथयात्रा मुख्य मंदिरापासून सुरू होऊन 2 किमी अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात संपवली जाते. येथे भगवान जगन्नाथ सात दिवस विश्रांती घेतात आणि आषाढ शुक्ल दशमीला पुन्हा रथावर स्वार होऊन मुख्य मंदिरात येतात, अशी अख्यायिका आहे.

हेही वाचा: Udaipur Murder : भाजप नेत्याच्या आवाहनावर २४ तासांत १.३७ कोटींची देणगी

कलियुगातील पवित्र निवासस्थान म्हणून जगन्नाथपुरीची ओळख

पौराणिक मान्यतांमध्ये चारधाम हे एका युगाचे प्रतीक मानले जातात. त्याचप्रमाणे जगन्नाथपुरीला कलियुगातील पवित्र निवासस्थान मानले जाते. देशाच्या पूर्वेला असणाऱ्या ओरिसा राज्यात ही ठिकाण आहे. पुरुषोत्तम पुरी, निलांचल, शंखा आणि श्रीक्षेत्र अशा प्राचीन नावांनी ओळखलं जातं. ओरिसा किंवा उत्कल प्रदेशातील एक प्रमुख देवता म्हणून भगवान जगन्नाथ आहे, असे मानले जाते. भगवान जगन्नाथाची मूर्ती ही राधा आणि श्रीकृष्णाची जोडी असल्याची भाविकांची धार्मिक भावना आहे. श्रीकृष्ण हे भगवान जगन्नाथाचे अंश आहेत. म्हणूनच भगवान जगन्नाथ हे पूर्ण देव मानले जातात.

हेही वाचा: Nashik : आगामी कुंभमेळा सन 2027 च्या तारखा आखाडा परिषदेकडे सादर

मंदिराचे स्वरूप कसे आहे ?

जगन्नाथ मंदिर 4, 00, 000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले असून त्याच्याभोवती सीमा भिंत आहे. कलिंग शैलीतील मंदिर स्थापत्य आणि कलाकुसरीच्या विस्मयकारक वापराने परिपूर्ण असलेलं हे मंदिर देशातील भव्य स्मारकांपैकी एक आहे. मंदिराच्या शिखरावर भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र बांधले आहे. त्याला नीलचक्र असेही म्हणतात. ते अष्टधातुपासून तयार केले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात मुख्य देवतांच्या मूर्ती बसवल्या आहेत. मुख्य इमारत 20 फूट उंच भिंतीची आहे. मुख्य दरवाजाच्यासमोर सोळा बाजूंनी एक भव्य अखंड स्तंभ आहे.

Web Title: Fact Check Interesting About Jaggannath Rath Yatra Desh News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top