Crime : हद्दच झाली! थेट मुख्यमंत्र्यांचच बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवलं; आरोपी अटकेत | fake death certificate of cm manohar lal khattar 5 people arrested in up | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime : हद्दच झाली! थेट मुख्यमंत्र्यांचच बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवलं; आरोपी अटकेत

सोनभद्र (उत्तर प्रदेश) : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीतील पाच सदस्यांना पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील पन्नूगंज पोलिस ठाण्यात अटक केली आहे. याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ऑपरेशन) त्रिभुवननाथ त्रिपाठी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या प्रकरणी पाच जणांना टोळीला अटक करण्यात आली आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचे जन्म आणि मृत्यूवरील डेटा प्रोसेसिंग सहाय्यक मनोज कुमार यांनी 10 फेब्रुवारीला माहिती दिली की, नोंदणी क्रमांक D/2023.60339-000021 वर मनोहर लाल यांच्या नावाने 2 फेब्रुवारी 2023 रोजी जारी केलेले मृत्यू प्रमाणपत्र पूर्णपणे बनावट आहे.

त्रिभुनवनात त्रिपाठी यांनी सांगितलं की, या माहितीच्या आधारे पन्नूगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पथकाने प्रशांत मौर्य, मोनू शर्मा उर्फ ​​शिवानंद शर्मा, अन्सार अहमद, मो कैफ अन्सारी आणि जन्म आणि मृत्यू सांख्यिकी विभागात समन्वयक म्हणून काम करणारा कंत्राटी कर्मचारी यशवंत याला अटक केली आहे. आरोपींकडून चार लॅपटॉप आणि सात मोबाईल जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Bjpcrime