Sandip Deshpande Attack: वरुण सरदेसाईंकडं नितेश राणेंचा रोख; विधानसभेत केली मोठी मागणी

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला
Nitesh Rane
Nitesh Raneesakal

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु होते. सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यावर चार अज्ञातांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. राजकीय वैमनस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Nitesh Rane
Sanjay Raut : शिवसेना तुमच्या बापाची आहे का? अर्वाच्य शब्दांत राऊतांची निवडणूक आयोगावर टीका

समोर आलेल्या माहिती नुसार त्यांच्या डोक्यावर स्टंपने हल्ला करण्यात आला. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु होते त्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे.

मात्र या हल्ल्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात आक्रमक होत म्हणाले की, संदीप देशपांडे हे मागील काही काळा पासून वरूण सरदेसाई नावाच्या माणसावर आरोप करत आहेत. त्यामुळे वरूण सरदेसाईचा या प्रकरणात काही हस्तकक्षेप आहे का याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली आहे.

Nitesh Rane
Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंवरील हल्ल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया; एकटं पाहून...

संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणूकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.

1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com