

छत्तीसगडच्या बिलासपूर येथील एका व्यक्तीला भोपाळ सायबर क्राईम शाखेने 500 लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हा व्यक्ती 12वी उत्तीर्ण असून त्याचे नाव हरिश भारद्वाज आहे. सहा बनावट वैवाहिक वेबसाइट्सच्या माध्यमातून देशभरातील अनेक अविवाहित व्यक्तींना फसवत होता. या साइट्सद्वारे तो मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करत होता.