

UP STF Nabs Imposter: Alleged 'Intelligence Officer' Busted in High-Rise Raid
esakal
उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने बुधवारी सकाळी कारवाई करत एका बनावट RAW अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या. हा आरोपी कधी लष्करी मेजर तर कधी रॉ संचालक म्हणून स्वतःला सादर करायचा. याच बनावट ओळखीच्या जोरावर त्याने बिहारमधील छपरा येथे कार्यरत एका महिला न्यायिक दंडाधिकारीला फसवून तिच्याशी लग्नही केले होते. ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.