देशात 21 विद्यापीठं बनावट, UGC ने जाहीर केली यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशात 21 विद्यापीठं बनावट, UGC ने जाहीर केली यादी

देशात 21 विद्यापीठं बनावट, UGC ने जाहीर केली यादी

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पुन्हा एकदा बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे, यामध्ये 21 विद्यापीठ हे बनावट असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यापीठे ही दिल्ली मधील, नंतर उत्तर प्रदेश मधील आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC चे नियमांचा अहवाल देत सांगितलकी UGC च्या नियमांचे पालन केल्यानंतरच UGC विद्यापीठांना मान्यता देते.

त्या नियमांच उल्लंघनकेल्या नंतर विद्यापीठाला बनावट समजले जाते. सांगितल जात आहे या वर्षात विद्यापीठ अनुदान आयोगाने शेकडो बनावट विद्यापीठांवर कारवाई केली आहे. बनावट विद्यापीठांबाबत UGC जाहिर केलेल्या सूचनांनमध्ये विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना कळवण्यात आले आहे की, देशाच्या विविध भागांमध्ये अशी 21 विद्यापीठे आहेत. जी स्वत: तयार करण्यात आली आहेत आणि त्यांना कोणतीही मान्यता नाही. ही सर्व विद्यापीठे, विद्यापीठ अनुदान आयोग, कायदा 1956 चे उल्लंघन करत आहेत.

हेही वाचा: काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद यांची मोठी घोषणा; काढणार स्वतःचा पक्ष?

UGC च्या माहिती नुसार बनावट विद्यपीठांमध्ये सगळ्यात जास्त दिल्लीमध्ये 8, उत्तर प्रदेश मध्ये 4 , पश्चीम बंगाल मध्ये 2, ओडीसा 2 तसेच महाराष्ट्र, केरल, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेश मध्ये प्रत्येकी 1-1 बनावट विद्यापीठे आहेत. सार्वजनिक सूचनेनुसार, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956 च्या कलम 22(1) नुसार, केंद्रीय, राज्य, प्रांतीय कायद्यांतर्गत स्थापन झालेली विद्यापीठे किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कलम 3 अंतर्गत स्थापन झालेली डीम्ड विद्यापीठे पदवी देऊ शकतात. ज्यांना विशेष संसदेच्या कायद्याद्वारे पदवी प्रदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

Web Title: Fake University List Delhi Ugc Crackdown

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :UniversityUGC