काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद यांची मोठी घोषणा; काढणार स्वतःचा पक्ष? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulam Nabi Azad

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद यांची मोठी घोषणा; काढणार स्वतःचा पक्ष?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आझाद यांनी कॉंग्रेस माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना 5 पानी राजीनामा पाठवला आहे. कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी मोठी घोषणा केली आहे. "ते म्हणाले की आता जम्मू काश्मीर मध्ये जाणार आणि नवा पक्ष काढणार आहे."

राजीनामा दिल्यानंतर अंदाज लावला जात होता की आझाद हे भाजप मध्ये प्रवेश करतील. पण त्यांनी स्पष्ट केलं आहे, की मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. ते म्हणाले" गेल्या तीन वर्षापासून विरोधी पक्षातील काही लोकांनी मोकळ्यात आफवा उठवल्या होत्या की मी भाजप मध्ये प्रवेश करणार आणि प्रवेश केल्या नंतर मला राष्ट्रपती किवा उपराष्ट्रपती बनावनार पण तस काही नाही मी कश्मिर मध्ये जाणार आणि नवा पक्ष काढणार आहे. आणि लवकरच आम्ही राष्ट्रीय स्थरावर दिसेल."

हेही वाचा: गुलाम नबी आझादांच्या नाराजीची ४ कारणं; जाणून घ्या, Inside Story

दरम्यान आझाद परत एकदा राष्ट्रीय राजकारणात पुन्हा सक्रीय होताना दिसनार आहेत. याच्या आगोदर आझाद पाच वर्षे जम्मू कश्मीरच्या राजकारणात सक्रीय होते. त्यांनी 2005 मध्ये जम्मू कश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार संभाळला होता. गुलाम नबी आझाद हे देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या G-23 गटाचा भाग होते. गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांना प्रचार समितीचे अध्यक्ष केले होते. त्यांनी त्या पदाचा देखील राजीनामाही दिला आहे. त्यांनी पत्र लिहून राहुल गांधींवर जोरदार हल्ला केला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींना अनुभवी लोकांनी घेरले आहे. पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना बाजूला करण्यात आले आहे.

Web Title: Ghulam Nabi Azad Announcement Resigning Congress Own Party Jammu Kashmir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..