
एका नवजात बाळाला जीवंत पुरण्यात आले. पण, रात्रीच्या स्मशान शांततेत बाळाचा रडण्याचा आवाज आला. नागरिकाने घटनास्थळी धाव घेत बाळाला सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
लोहरदगा (झारखंड): एका नवजात बाळाला जीवंत पुरण्यात आले. पण, रात्रीच्या स्मशान शांततेत बाळाचा रडण्याचा आवाज आला. नागरिकाने घटनास्थळी धाव घेत बाळाला सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती सुधारत असून, देव तारी त्याला कोण मारी... या म्हणीचा प्रत्येय येथे आला आहे.
बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ आला पुन्हा चर्चेत...
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चंदलासो धरणाजवळील स्मशानभूमीत शनिवारी (ता. 8) एका नवजात बाळाला पुरण्यात आले होते. पण, रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीजवळून जात असताना एका व्यक्तीला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. या व्यक्तीने घटनास्थळी जाऊन पाहिले असता एक नवजात बाळ मातीमध्ये अर्धे पुरले असल्याचे दिसले. त्यांनी बाळाला सुखरूप बाहरे काढले आणि डॉक्टरांकडे घेऊन गेले. रुग्णालयात बाळावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सापाची दहशत; तीन भावांचा मृत्यू
दरम्यान, स्मशानभूमीत नवजात बाळाला पुरल्याची माहिती मिळताच कुरू पोलिस स्टेशनचे प्रभारी अनिरुद्ध मुरारी कुमार घटनास्थळी दाखल झाले. याबाबतचा पुढील तपास त्यांनी सुरू केला आहे. नवजात बाळाच्या पालकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पण, नवजात बाळाला पुरल्याची माहिती मिळताच जवळपासचे गावकरी एकत्र आले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.