सापाची पुन्हा दहशत; तीन भावांचा मृत्यू

वृत्तसंस्था
Friday, 7 August 2020

उत्तर प्रदेशात सापाची दहशत असून, झोपेत असताना दंश केल्यामुळे तीन भावांचा मृत्यू झाला आहे. बहराईच जिल्ह्यात नागीण तब्बल २६ जणांना डसली असून, सहा जनावरांनाही तिने चावा घेतला आहे. सापाच्या दहशतीमुळे नागरिक गाव सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत.

सीतापूर: उत्तर प्रदेशात सापाची दहशत असून, झोपेत असताना दंश केल्यामुळे तीन भावांचा मृत्यू झाला आहे. बहराईच जिल्ह्यात नागीण तब्बल २६ जणांना डसली असून, सहा जनावरांनाही तिने चावा घेतला आहे. सापाच्या दहशतीमुळे नागरिक गाव सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत.

Video: युवती स्विमिंगदरम्यान गेली स्टंट करायला अन्...

सीतापूर परिसरातील मनिकापूर गावात सुनील यांची तीन मुले घरात झोपली होती. मध्यरात्री आईला रात्री जाग आल्यावर तिन्ही मुले निपचीत पडली होती. मुलांची अवस्था पाहून आईने टाहो फोडला. तिन्ही मुलांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात खासगी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याआधीच या मुलांचा मृत्यू झाला होता. शरीरात जास्त प्रमाणात विष पसरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मुलांच्या अचानक जाण्यानं सुनील आणि त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नागीण घेतेय बदला; 26 जणांना डसली अन्...

दरम्यान, नाग पंचमीच्या दिवशी नाग मारल्यामुळे संतप्त नागीण आता परिसरातील नागरिकांना डसत असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. शंकरपूर, चिलबिला, बेलभरिया यासह काही खेड्यांमध्ये सापाने २६ नागरिकांसह सहा जनावरांना चावा घेतला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थ आपल्या मुलांना नातेवाईकांकडे राहायला पाठवत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three children died due to snake bite at uttar pradesh