
गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. सरकारकडून सातत्यानं आवाहन केल्यानंतरही उच्चशिक्षित असेलेलसुद्धा यात अडकत आहेत. आता उत्तर प्रदेशातील नोएडात एका कुटुंबालाच पाच दिवस डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. एका कुटुंबाला अज्ञातांना पाच दिवस डिजिटल अरेस्ट केलं आणि एक कोटीपेक्षा जास्त रुपये उकळले. आरोपींनी कुटुंबाला सरकारी अधिकारी असल्याचं सांगत भीती घातली होती.