

Ranga Reddy Tragic Accident Three Daughters Die in Bus Truck Collision in Telangana
Esakal
चेवेल्ला : रांगा रेड्डी जिल्ह्यात रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या या धडकेत तब्बल १० महिन्याच्या बाळासह १९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन जणी हैदराबादच्या कोटी महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थिनी तंदूर तालुक्यातील गांधीनगर येथील येलग्या गौडा कुटुंबातील होत्या. एका क्षणात घडलेल्या या अपघाताने संपूर्ण परिसराला हादरा बसला आहे. या तिघी बहिणी हैदराबादमध्ये शिक्षण घेत असलेल्या तनुषा, साईप्रिया आणि नंदिनी या सकाळी गावावरून हैदराबादकडे परतत होत्या.